कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ठाण्यातील पेट्रोल पंप आता १२ तासच खुले राहणार आहेत. ठाणे पेट्रोल पंप वितरकांच्या संघटनेतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचारी हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक पध्दतीनं काम करत आहेत. त्यामुळं कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून कर्मचा-यांनी पेट्रोल पंप मर्यादित काळात चालू ठेवण्याची मागणी केली होती त्यानुसार पेट्रोल पंप वितरकांच्या संघटनेनं इंधन ही अत्यावश्यक बाब असताना पेट्रोल पंपाच्या कामाच्या वेळांवर मर्यादा आणली आहे. आता पुढील सूचना मिळेपर्यंत पेट्रोलपंप हे सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेतच खुले राहणार आहेत.