कोरोना कोवीड-19 शी लढण्यासाठी सढळ हाताने मदत करा वस्तू रूपात मदत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना कोवीड हा साथरोग म्हणून घोषित केला आहे. भारतातही या साथीचा प्रसार होत असून ठाणे शहरातही या साथ रोगाने जवळपास 11 व्यक्ती बाधित झाल्या आहेत. भविष्यात याची व्याप्ती रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वैद्यकिय उपकरणे, औषधी साठा, वस्तूंची गरज भासणार असून शहरातील दानशूर व्यक्तींनी करोना कोवीड19 विरूद्ध लढण्यासाठी वैद्यकिय उपकरणे आणि औषधांसाठी मदत करण्याचे आणि या लढ्याला बळ देण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.
कोरोना कोवीड 19 या साथरोगाने जगातील जवळपास 199 देश प्रभावित झाले आहेत. जगभरात जवळपास 7 लक्ष, 87 हजार, 438 लोक कोरोनामुळे बाधित झाले असून 37 हजार 846 व्यक्तींचा कोरोनाची बाधा झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. भारतामध्ये जवळपास 1362 बाधीत रूग्णांची संख्या झाली असून यामध्ये आतापर्यंत 46 लोकांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे शहरही याला अपवाद नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमधील सर्वात दाट लोकवस्तीचे शहर असलेल्या ठाणे शहरामध्ये आतापर्यंत एकूण 12 बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. कोरनाविरूद्धचा हा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी आणि यातील बाधितांना मदत करण्यासाठी मोठया प्रमाणात व्हेंटिलेटर्स, एन 95 मास्क, थ्री लेयर्स मास्क, मेडिकल गॅागल्स, हातमोजे, पीपीई किटस् आदी वैद्यकीय उपकरणांची आवश्कता भासणार आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात औषधे आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी आवश्यक त्या औषधांची गरज भासणार आहे.
कोरोना कोवीड-19 शी लढण्यासाठी सढळ हाताने मदत करा
वस्तू रूपात मदत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading