कोरोनाविषयी नागरिकांना शंका वाटल्यास आता विषयातील तज्ज्ञ डॅाक्टरांचा सल्ला घेण्याची सुविधा

कोरोनाविषयी नागरिकांना शंका वाटल्यास आता त्यांच्यासाठी दूरध्वनीवरूनविविध विषयातील तज्ज्ञ डॅाक्टरांचा सल्ला घेण्याची सुविधा उपलब्ध करूनदेण्यात आली आहे.

महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त विजयसिंघल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे चॅप्टरच्या संयुक्त विद्यमाने हाउपक्रम सुरू करण्यात आला असून या माध्यमातून सोशल डिस्टन्सचा महत्वाचाउद्देशही साध्य होणार आहेयासंदर्भातील खासगी प्रतिथयश तज्ज्ञ डॅाक्टरांची यादी महापालिकेच्यावतीनेप्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये फॅमिली, फिजिशियन, सर्जन, स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ, युरॅालॅाजिस्ट, सोनालॅाजिस्ट, रेडिओलॅाजिस्ट, बालरोग तसेच मधुमेह तज्ज्ञ आदी विविध तज्ज्ञ आणि प्रतिथयशडॅाक्टरांचा समावेश आहे.या सर्व तज्ज्ञ डॅाक्टरांची नावे आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांकमहापालिकेच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले असून नागरिकांना त्यांच्यांशीदूरध्वनीवरून सल्ला घेता येवू शकणार आहे. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभघ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading