कोरोनावर विजय मिळवणा-या पोलिसांचे कळवेकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत

कोरोना महामारीच्या विरोधात लढाई लढत कोरोनावर विजय मिळवणा-या पोलिसांचे कळवेकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. कोरोना संसर्गचे संकट असताना सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस जीवाची कुटूंबाची पर्वा न करता अहोरात्र मुकाबला करीत आहेत. आज करोना विरोधी लढाईत कोरोनावर मात करणाऱ्या पोलीसांचे कळवेकरांनी उस्फुर्त स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र पोलीस जिंदाबादचा नारा देत, टाळ्या, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पोलिसांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. केक कापून पोलिसांना ओवाळून आरती करण्यात आली. कळवा पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी कोरोनावर विजय मिळवणा-या पोलिसांचे स्वागत केले. यावेळी कळवेकर मोठया संख्येने स्वागताला उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading