कोरोनाबाधित आरोपींमुळे पोलीसांनाही कोरोनाचा धोका

कापूरबावडी पोलीस ठाण्यातील एक आरोपी कोरोनाबाधित झाल्यामुळे या आरोपीच्या संपर्कात आलेल्या 12 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असुन पोलीस कर्मचाऱ्यांच्याही चाचण्या करण्यात येणार आहेत. कोरोनामुळे पोलीसांवरील ताण वाढत असून सतत येणा-या कोरोना रूग्णांच्या संपर्कामुळे त्यांच्या जिविताचा प्रश्नही निर्माण झाला आहे. विविध पोलीस ठाण्यात घडणाऱ्या गुन्ह्यातील आरोपीना पोलीस सातत्याने अटक करीत असतात. अटक केलेला आरोपी कोरोनाबाधित आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचा-यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. त्याचबरोबर आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयातील वकील, सुनावणी करणारे न्यायाधीश हे देखील संकटात सापडण्याची शक्यता बळावत असल्याने पोलीस आणि न्यायालयीन कर्मचारी धास्तावले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading