कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खाजगी रूग्णवाहिकांचा भाड्याचा दर निश्चित

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने खाजगी रूग्णवाहिकांचा भाड्याचा दर निश्चित केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ठिकठिकाणी रूग्णवाहिका मोठ्या प्रमाणावर लागत आहेत. परंतु काही मंडळी याचा फायदा उठवत असून रूग्णांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे आता प्रादेशिक परिवहन विभागानेच ठाणे शहरातील खाजगी रूग्णवाहिकांचे दर निश्चित केले आहेत. वातानुकुलित नसलेल्या मारूती व्हॅनसाठी ० ते १० किलोमीटरच्या अंतरासाठी ५०० रूपये, १० ते २० किलोमीटरच्या अंतरासाठी १ हजार रूपये, २० ते ३० किलोमीटरसाठी १५०० रूपये आणि ३० पेक्षा जास्त किलोमीटरसाठी २० रूपये किलोमीटरप्रमाणे दर आकारला जाईल तर प्रतिक्षा कालावधीचा दर प्रति तासासाठी ५० रूपये आकारण्यात येईल. टाटा सुमो, मेटॅडोर पध्दतीच्या वातानुकुलित नसलेल्या गाडीसाठी १० किलोमीपर्यंत ६०० रूपये, १० ते २० किलोमीटरसाठी १२०० रूपये, २० ते ३० किलोमीटरसाठी १६०० रूपये आणि ३० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी २३ रूपये प्रति किलोमीटर प्रमाणे दर आकारण्यात येईल तर प्रतिक्षा कालावधीसाठी प्रति तासाला ५० रूपये दर आकारला जाईल. टाटा-४०७, स्वराज माझदा सारख्या वातानुकुलित नसलेल्या वाहनांसाठी १० किलोमीटरपर्यंत ७०० रूपये, १० ते २० किलोमीटरसाठी १३०० रूपये, २० ते ३० किलोमीटरसाठी १७०० रूपये आणि ३० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी २५ रूपये प्रति किलोमीटर प्रमाणे दर आकारला जाईल. तर प्रतिक्षा कालावधीसाठी प्रति तासाला ७५ रूपये आकारण्यात येतील. आयसीयु वातानुकुलित साठी १० किलोमीटरपर्यंत २ हजार रूपये, १० ते २० किलोमीटरला ३ हजार, २० ते ३० किलोमीटरला ४ हजार आणि ३० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी ५५ रूपये प्रति किलोमीटरप्रमाणे दर आकारण्यात येईल. तर प्रतिक्षा कालावधीसाठी १०० रूपये प्रति तासासाठी आकारण्यात येतील असं प्रादेशिक परिवहन विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading