कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात कडक अंमलबजावणी करण्याचे महापौरांचे आदेश

ज्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आली आहेत त्या ठिकाणी कडक अंमलबजावणी करावी, शहरात विनामास्क ‍फिरणाऱ्यांवर दंड आकारावा, चाचण्यांची संख्या वाढवावी तसेच कोरोनामुळे होत असलेले मृत्यू रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी असे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत. कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कडक उपाययोजनांबाबत महापौरांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. कोरोना रुग्णांची संख्या ज्या विभागात जास्त आहे त्या ठिकाणी नियमित औषधफवारणी आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक क्षमतेने काम करावे, जे दुकानदार सोशल डिसटन्सींगचे पालन करणार नाहीत अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना विनामास्क ये-जा करतील अशांवरही दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना महापौरांनी यावेळी दिल्या. कोरोनासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये काही खाजगी रुग्णालये आपला सहभाग देवू इच्छित असून तशी परवानगी ते महापालिकेकडून मागत आहेत. परंतु अशा रुग्णालयामधील सेवासुविधांची खात्री करुन तद्ननंतरच नवीन रुग्णालयांना परवानगी देण्यात यावी. तसेच अँटीजेन चाचण्यांची संख्या ही कंटेनमेंट झोन आणि हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी वाढविण्यात यावी. हायरिस्क असलेल्या व्यक्तींना सुध्दा होमकोरंटाईन न करता त्यांचे विलगीकरण कोविड सेंटरमध्ये करण्यात यावे जेणेकरुन कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल. कोरोनाबाधित रुग्णांवर वेळीच आवश्यक उपचार उपलब्ध व्हावे यादृष्टीने कार्यवाही करावी तसेच कोरोनापासून होणारे मृत्यू रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कोविड रुग्णालयांशी संपर्क साधून वैद्यकीय उपचारासंदर्भात डॉक्टरांशी सल्लामसलत करुन आवश्यक त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading