कोपरी रेल्वे ब्रिजवर डांबरीकरणाच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे वाहतूक विभाग अंतर्गत कोपरी वाहतूक उप विभागाच्या हद्दीत कोपरी रेल्वे ब्रिजवर डांबरीकरणाचे काम करण्यात येणार असून १) नाशिक-मुंबई वाहिनीवर दि. २४ जानेवारी २०2३ रोजी रात्रौ २३,०० ते दि. २५ जानेवारी २०2३ रोजी सकाळी ०६.०० वा. पर्यंत,             २) मुंबई-नाशिक वाहिनीवर दि. २५ जानेवारी २०2३ रोजी रात्रौ २३.०० ते दि. २६ जानेवारी २०2३ रोजी सकाळी ०६.०० वा. पर्यंत कोपरी रेल्वे ब्रिज वरून नाशिक मुंबई व मुंबई नाशिक वाहिनीवरील सुरु असलेली वाहतुक पुर्णपणे बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याची माहिती  ठाणे शहर वाहतूक विभागाचे  पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

            ठाणे शहर अंतर्गत परिसरातून राज्यांतर्गत व बाहेरील राज्यातून मुंबई पूर्व द्रुतगती महामागति जड अवजड व हलक्या वाहनांची मोठया प्रमाणात ये-जा होत असते. ठाणे बाजुकड़न मुंबई कडे व मुंबई बाजुकडुन ठाणेकडे जाणा-या सर्व प्रकारच्या हलक्या व जड़ अवजड वाहनांना प्रवेश बंद करावा लागणार आहे. त्याकरीता वाहनाची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याने व ठाणे परिसरात वाहतुक कोंडी होवू नये, वाहतुक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी वाहतूकीत बदल करण्यात आला  आहे.

जड- अवजड वाहनांकरीता

            प्रवेश बंद – १) नाशिक मुंबई महामार्गाने ठाणे शहरातुन मुंबई पुर्व द्रुतगतीमार्गाने मुंबईकडे जाणा-या जड -अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग – सदरची वाहने खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेवून गॅमन चौक- पारसिक रेती बंदर- मुंब्रा बायपास- – शिळफाटा उजवे वळण घेवुन महापे मार्गे- रबाळे ऐरोली ब्रिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गानि इच्छित स्थळी जातोल.

            प्रवेश बंद – २) घोडबंदर महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने मुबईकडे जाणा-या जड अवजड वाहनांना माजीवाडा ब्रिजवर उजवे वळण घेण्यास व गोल्डन क्रॉस माजीवाड़ा ब्रिज खाली प्रवेश बंद करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग – सदरची वाहने तत्वज्ञान सिग्नल पुढे माजीवाड़ा ब्रिज वरून खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेवून गॅमन चौक- पारसिक रेती बंदर-मुंब्रा बायपास-शिळफाटा उजवीकडे वळण घेवून महापे मार्गे रबाळे ऐरोली ब्रिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.

हलक्या वाहनांकरीता

        प्रवेश बंद – नाशिक व घोडबंदर रोडने तसेच ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने मुंबईकडे जाणा-या सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांना तीन हात नाका ब्रिज येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग – १) नाशिक कडुन मुंबई कडे जाणारी हलकी वाहने साकेत कट डावीकडे वळण घेवून महालक्ष्मी मंदिर – साकेत रोड-किक नाका- डावीकडे वळण घेवून शिवाजी चौक कळवा-विटावा- ऐरोली मार्गे-ऐरोली ब्रिज-ऐरोलो बिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.

            पर्यायी मार्ग – २) ठाणे शहरातुन मुंबई कडे जाणारी हलकी वाहने जी. पी. ओ. ऑफिस- ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह रोड-आर. टी.ओ. कार्यालय समोरून किक नाका-कळवा ब्रिज-शिवाजी चौक कळवा-विटावा- ऐरोली मार्गे- ऐरोली ब्रिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.

            पर्यायी मार्ग –  (३) गोडबंदर रोड व ठाणे शहरातुन मुंबई कडे जाणारी हलकी वाहने तीन हात नाका येथून उजवीकडे वळण घेवून एल.बी.एस. रोडने मॉडेला चेकनाका मार्गे मुंबईकडे इच्छित स्थळी जातील.

            पर्यायी मार्ग – ४) घोडबंदर रोड व ठाणे शहरातून मुंबई कडे जाणारी हलकी वाहने तीन हात नाका-तुळजा भवानी मंदिर – कट-सर्व्हिस रोडने कोपरी ब्रिज-कोपरी सर्कल- बारा बंगला फॉरेस्ट ऑफिस- माँ बाल निकेतन स्कुल- आनंदनगर चेक नाका मार्गे मुंबईकडे इछित स्थळी जातील.

            ही वाहतूक अधिसूचना १) नाशिक-मुंबई वाहिनीवर दि. २४ जानेवारी २०२३ रोजी रात्री २३.०० ते                  दि. २५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०६.०० वा. पर्यंत. २) मुंबई-नाशिक वाहिनीवर दि. २५ जानेवारी २०२३ रोजी रात्री २३.०० ते दि. २६  जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०६.०० वा. पर्यंत अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना  पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सिजन गैस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे  पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी एक प्रसिध्दी पत्रकेद्वारे कळविले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading