कोपरी पूलाच्या कामासाठी १६ आणि १७ जानेवारीला कोपरी पूलावरील वाहतूक पूर्णत: बंद

कोपरी पूलाचे गर्डर टाकण्याचं काम १६ आणि १७ जानेवारी रोजी केलं जाणार असल्यामुळं कोपरी पूलावरील वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. कोपरी पूलावर मोठा क्रेन उभा करून १६ आणि १७ या दोन दिवशी पहाटे काम केलं जाणार आहे. त्यामुळं कोपरी पूलावरील दोन्ही बाजूची वाहतूक रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवली जाणार आहे. हे काम सुरू असताना सर्व वाहनांना पर्यायी मार्गाचा उपयोग करावा लागेल. नाशिककडून मुंबईकडे जाणारी जड वाहनं ही खारेगाव टोलनाक्याकडे डावे वळण घेऊन शीळफाटा मार्गे ऐरोली पूलावरून मुंबईला जाता येईल. घोडबंदर मार्गावरून येणा-या वाहनांना खारेगाव टोलनाका येथून डाव्या बाजूनं वळण घेत मुंब्रा-बायपास मार्गे महापे आणि ऐरोली पूलामार्गे मुंबईकडे जाता येईल. हलक्या वाहनांना नाशिककडून मुंबईकडे जाताना ठाणे कारागृहामार्गे कळवा पूल, ऐरोलीमार्गे मुंबईकडे जाता येईल. घोडबंदर कडून येणा-या वाहनांना मॉडेला चेकनाकामार्गे मुंबईकडे जाता येईल. दोन दिवस ही व्यवस्था लागू राहणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading