कोपरी पुलावर गर्डर लॉचिंगसाठी वाहतुकीत बदल

पूर्व द्रूतगती महामार्गावरील कोपरी पुलावर गर्डर बसविण्याच्या कामासाठी येत्या शनिवार-रविवारी दळणवळण बंद करून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. ठाणे वाहतुक शाखेच्या अधिसूचनेनुसार,२३ आणि २४ जानेवारीला रात्री ९ ते पहाटे ६ वाजेपर्यंत प्रवेश बंद केला असुन मध्य रेल्वेकडून २३ आणि २४ जानेवारीच्या मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ठाणे ते मुलुंड स्थानकादरम्यान विशेष ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. कोपरी पुलावर गेल्या आठवडयात सात गर्डर उभारण्यासाठी ठाणे शहर वाहतुक शाखेमार्फत दोन दिवस रात्रीच्या वेळेत वाहतुकीत बदल केले होते. त्याच धर्तीवर २३ आणि २४ जानेवारीला रात्री ठाण्यातुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी जड-अवजड आणि हलक्या वाहनासाठी मार्गात बदल करण्यात आले आहेत.कोपरी रेल्वे पुलाऐवजी वाहनांनी एल.बी.एस रोड, मॉडेला चेकनाका, तीन हात नाका अथवा साकेत, कळवा- विटावा ते ऐरोली आणि कोपरी – बारा बंगला ते मुंबई या मार्गाचा अवलंब करावा. जड वाहनांना ऐरोली, रबाळे, दिवा गाव सर्कल, खेडेकर चौक, टी पॉईंट जक्शन, रबाळे नाका, महापे, शिळफाटा येथून मुंब्रा बायपासमार्गे, खारेगाव, माजीवडा किंवा भिवंडीच्या दिशेने जाता येईल.मुंबईच्या दिशेकडुन येताना एलबीएस मार्गाचा अवलंब करावा लागेल.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading