कोपरी पादचारी ब्रिज काढण्याचे काम वेळेआधी पूर्ण झाल्यानं आता हा ब्रीज वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. काल रात्री आणि आज रात्री असे दोन दिवस काम करण्यासाठी वाहतूक शाखेमार्फत वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात बाबत सूचना देण्यात आल्या होत्या. पण हे काम एक दिवसातच पूर्ण झाल्यानं आज रात्री ब्रीज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार नाही. तसेच कोपरी ब्रिज च्या नविन तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामही वेळेपूर्वी करण्यात आलं आहे. वाहतूक शाखेच्या सर्व अधिकारी अंमलदार यांच्या योग्य नियोजनाने हे काम वेळेपूर्वी पूर्ण करण्यात आलं आहे. त्यामुळे कोपरी ब्रिज हा आज नेहमीप्रमाणे वाहतुकीस खुला राहील असं वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं.