कोपरी परिसराचा पाणी पुरवठा बुधवारी २४ तास बंद

कोपरी परिसराचा पाणी पुरवठा बुधवारी २४ तास बंद राहणार आहे.
कोपरी क्षेत्रातील कन्हैयानगर जलकुंभास नव्याने बसविण्यात आलेली डाउनटेक पाईप मुख्य वितरण जलवाहिनीस जोडणे आवश्यक आहे. हे काम अत्यंत तातडीचे असल्याने बुधवारी सकाळी ९ ते गुरूवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास कन्हैयानगर जलकुंभावरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे कन्हैयानगर जलकुंभा अंतर्गत कोळीवाडा, सुदर्शन कॉलनी, साईनगर, नातु कॉलनी, सावरकर नगर, वाल्मिकीपाडा सोसायटी, कुंभारवाडा, गुरुदेव सोसायटी, कृष्णानगर आणि स्वामी समर्थ मठ परिसराचा पाणी पुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे असं महापालिकेने कळवलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading