कोपरीतील बेकायदेशीर फटाका साठ्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ धर्मराज्य पक्षातर्फे बेलापूर येथे लाक्षणिक उपोषण

कोपरीतील बेकायदेशीर फटाका साठ्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ धर्मराज्य पक्षातर्फे बेलापूर येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. संयुक्त मुख्य विस्फोटक नियंत्रक पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संघटन यांच्याकडून कोणतीही पाहणी न करता ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी या निवासी भागात बेकायदेशीररित्या फटाके परवाने मंजूर करण्यात आल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. या परिसरात मंजूर करण्यात आलेली फटाक्यांची दुकानं निवासी आणि गर्दीच्या भागात आहेत. या दुकानांमध्ये धार्मिक सणाच्या माध्यमातून परवाना क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा करण्यात येतो. संबंधित दुकानांचे अग्निशमन विभागानं विक्री साठवणूक ना हरकत प्रमाणपत्र रद्द केले असता विस्फोटक नियंत्रकांकडून परवाने मंजूर केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर संयुक्त मुख्य विस्फोटक नियंत्रक पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संघटन यांच्याकडून कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात येत नसल्यामुळं हे उपोषण करण्यात आलं. उपोषणानंतर या आशयाचं निवेदन उपमुख्य विस्फोटक नियंत्रकांना देण्यात आलं. त्यावेळी त्यांनी कोपरीतील बेकायदेशीर फटाके धारकांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्याचे लेखी आश्वासन दिलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading