कोथिंबीर मेथीला कवडीमोल भाव; पावसामुळे होतोय पालाभाज्यांवर परिणाम

गगनाला भिडलेले मेथी, कोथंबीरचे भाव आता कवडीमोल झाले आहेत. सततच्या पावसामुळे कोथिंबीर आणि मेथीच्या भाजीवर परिणाम झाला आहे. शेतातूनच माल भिजलेला येत असल्याने कोथिंबीर आणि मेथी खराब होत आहेत.
कोथिंबीरची जुडी 5 रुपये, 8 रुपये, 10 रुपये अशी विकली जात आहे तर मेथी 5 रु 10 रु ला एक जुडी अशी विकली जात आहे. कोथिंबीर मेथी खराब झाल्यामुळे काही माल जाग्यावरच पडून आहे. यात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पाऊस जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत या मालाचे भाव असेच राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading