कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूकी संदर्भात तक्रारींसाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना

कोकण शिक्षक मतदार संघ निवडणूक 2022-23 या निवडणुकीच्या कामासंदर्भात तक्रारींकरिता 24 तास चालू असणाऱ्या तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये तत्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता काळात आचारसंहितेच्या नियमांचा भंग अशा इतर अनुषंगिक तक्रारींकरिता तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या कामांसंदर्भात तक्रारींकरिता 27571516 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे उपायुक्त मनोज रानडे यांनी केले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading