कोकण विभाग शिक्षक मतदार यादीत नाव नोंदणीची 7 नोव्हेंबर अंतिम तारीख

विधान परिषदेच्या कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघात मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. ७ नोव्हेंबर ही मतदारयादीत नाव नोंदणीची अंतिम तारीख असून जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. भारत निवडणूक आयोगाने विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023 साठी मतदार नोंदणी सुरू केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत दावे- हरकती स्विकारण्यात येणार आहेत. तर 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. शिक्षक मतदार संघासाठी मतदार म्हणून जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक पात्र असून 1 नोव्हेंबरपूर्वी मागील सहा वर्षांपैकी तीन वर्षे माध्यमिक शिक्षक म्हणून काम करणारे, जिल्ह्यात रहिवास असलेले, तसेच मागील तीन वर्षात निवृत्त झालेल्या शिक्षकांना मतदार म्हणून नाव नोंदविता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालये, तहसीलदार कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय, कोकण भवनमधील सहायक पुरवठा अधिकारी कार्यालय आदी 14 ठिकाणी मतदार यादीतील नाव नोंदणी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading