कोकणीपाडा वन हक्क समितीच्या वतीने वन हक्क पट्टे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासींचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. हजारोंच्या संख्येने कोकणीपाडा, येऊर, पाटोनापाडा, भेंडीचापाडा, जाभूंळपाडा, चिराग नगर, वागळे स्टेट जुना गांव, वारली पाडा, वागळे इस्टेट परिसर, पालघर जिल्हा ठाणे जिल्हा, मुंबई जिल्हा, आरे कॉलनी , कोळीवाडे, कोळी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी जिल्हाधिका-यांशी वन पट्टे वाटपाबाबत चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिका-यांनी १५ जुन पर्यंत वन हक्क वन पट्टे वाटप करण्याचं आश्वासन दिल्याचं जयराम राऊत यांनी सांगितले.