कुष्ठरोग सर्वेक्षण मोहिम आढळलेल्या कुष्ठरोग्च्या उपचारात कोणती हयगय करू नये – महापालिका आयुक्त

कुष्ठरोग सर्वेक्षण मोहिम आढळलेल्या कुष्ठरोग्च्या उपचारात कोणती हयगय करू नये असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मांडल आहे. 13 ते 17 सप्टेंबर आणि 26 ते 7 सप्टेंबर या कालावधीत महापालिका कार्यक्षेत्रात तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठरोग तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत सहा लाख 98 हजार 710 नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये आढळून आलेल्या बाधित रुग्णांवर महापालिकेच्या वतीने योग्य उपचार आणि नियमित तपासणी तसेच मार्गदर्शन करण्याचे काम युद्धपातळीवर राबवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. संपूर्ण महापालिका क्षेत्रात राबवलेल्या या मोहिमेत 15 जणांना कुष्ठरोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महापालिकेच्या वतीने यासाठी 332 पथक कार्यान्वित करण्यात आली होती. या पथकाच्या माध्यमातून सतरा दिवस 624 सदस्यांची एकूण बारा हजार 973 घरांना भेटी देऊन तपासणी करण्यात आल. यामध्ये एकूण पाच रुग्णांना कमी प्रमाणात लागण तर दहा रुग्णांना जास्त प्रमाणात लागण झाल्याचे वैद्यकीय अधिकारी योगेश शर्मा यांनी सांगितले. कमी कमी प्रमाणात बाधित झालेल्या रुग्णांना किमान सहा महिने तर जास्त प्रमाणात बाधित रुग्णांना एक वर्ष नियमित उपचार घेणे गरजेचे आहे. यासाठी नियोजन करून औषध उपचार करण्याची कारवाई करावी यामध्ये हयगय सहन केली जाणार नाही असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला. नियमित उपचार केल्यास कुष्ठरोगावर निश्चितच मात करता येते याचा प्रसार देखील यातून होऊ शकतो असेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading