कार्यशैली बदला, शहर स्वच्छ ठेवा अन्यथा कारवाईला सामोरे जा – अतिरिक्त आयुक्त संजय हेरवडे

कार्यशैली बदला, शहर स्वच्छ ठेवा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा अतिरिक्त आयुक्त संजय हेरवडे यांनी दिला आहे. शहरातील स्वच्छतेचा दर्जा वाढवण्यासाठी आपल्या कामाची शैली बदलायला हवी सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कार्यक्षेत्रात वेळेवर हजर झालं पाहिजे, स्वच्छतेची काम झालेली दिसली पाहिजे, कागदपत्र नाचवणारी काम खपवून घेतल जाणार नाही असा कडक इशारा हेरवडे यांनी स्वच्छता निरीक्षकांना दिला आहे. एखाद्या वाहून घेतलेल्या अधिकारी कार्यकर्त्याप्रमाणे काम करण्याची वेळ आली आहे. हे जमणार नसेल तर महापालिकेतील त्या स्वच्छता निरीक्षकाला कडक कारवाईला सामोरे जावे लागेल अशी ताकीदही हेरवडे यांनी दिली. शहराची ओळख ही नेहमी स्वच्छतेतून होते शहर कचरा मुक्त करणे आणि शहराचा सौंदर्य वाढवणे हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे. आपल्या घरातील व्यक्ती वापरू शकेल इतकी सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता हवी. त्यासाठी कार्यक्षेत्रात पूर्णवेळ उभा राहून काम करून घ्या, स्मार्ट वॉच च्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांच्या कामावरच्या वेळा, जागा हे सगळं कळणार आहे, याची जाणीव ठेवावी असंही हेरवडे यांनी सांगितलं. कामांमध्ये त्रुटी आढळल्यास या त्रुटी पूर्ण करून घेणे ही स्वच्छता निरीक्षकांची जबाबदारी असून ती ते पूर्णपणे पार पाडतील असे अपेक्षाही हेरवडे यांनी व्यक्त केले. हे सर्व तपासण्यासाठी दक्षता पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. सकाळी सहा ते दुपारी दोन आणि दुपारी तीन ते रात्री 11 या काळात ही दक्षता पथक सर्वत्र फिरणार आहेत. हजेरी पेठेवरील कामगारांची हजेरी स्वच्छता, निरीक्षकांची उपस्थिती, सफाई कामगारांचा दर्जा, सफाई कामाचा दर्जा, कचरा संकलन, वाहनांच्या फेऱ्या हे सगळं तपासला जाणार असल्याचं उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading