कारागृहात महिला कर्मचा-यांच्या लैंगिक छळ प्रकरणाच्या चौकशी समितीला स्थगिती

ठाणे मध्यवर्ती कारागृहासह इतर कारागृहात महिला कर्मचा-यांच्या लैंगिक छळ प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला अध्यक्षा आणि तीन सदस्यांच्या समितीला स्थगिती देण्यात आली आहे. ठाणे कारागृहात महिला कर्मचा-याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कारागृहाचे प्रभारी अध्यक्ष हिरालाल जाधव यांच्यावर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. महिला छळ प्रकरणी चौकशीसाठी समिती नसल्यानं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षक कारागृह यांनी ४ सदस्यांची समिती गठीत केली होती. या समितीमध्ये कारागृह उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांची अध्यक्ष म्हणून तर समिती सदस्य म्हणून अरूणा अर्जुनराव, अरूणा मुनगुटराव, वर्षा कणिकदळे, सुनिल ढमाळ यांचा समावेश होता. या समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा होता. अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षक राजवर्धन यांनी अशा प्रकरणातील कारागृह अधिक्षक आणि वरिष्ठ अधिका-यांच्या चौकशीसाठी गठीत केलेल्या समितीला तूर्तास स्थगिती दिली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading