कलाशिक्षक आरती शर्मा यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने गौरव

 मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी  संस्थेच्या वतीने‎ कला क्षेत्रातील प्रसिद्ध स्केचो अ‌ॅक्टीवीटी सेंटर संस्थापिका  कलाशिक्षक आरती शर्मा यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला.  सुप्रसिध्द कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जपण्यासाठी गुणवंतांनी अखंड कार्यशील रहावे, असे आवाहन म्हात्रे यांनी  केले.  अरुण म्हात्रे यांनी विविध बहारदार कविता सादर करत साहित्य रसिकांना उत्कृष्ट काव्य श्रवणाची मेजवानी दिली.     मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील २५ क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या ५१ मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय सामाजिक ,राजकीय, कला ,शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना  हा विशेष पुरस्कार देण्यात येतो.  कलाशिक्षक आरती शर्मा  डॉ यशवंतराव दोडे विश्व विद्यालय सौ नलिनी यशवंतराव दोडे विद्यालय , मुलुंड पूर्व येथे सहाय्यक कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.आरती शर्मा यांनी कला आणि पर्यावरण संवर्धनाची संकल्पना घेवून ठाणे येथील स्केचो अ‌ॅक्टीवीटी सेंटरची  स्थापना केली. आरती शर्मा पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे  निस्वार्थ प्रशिक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बल  मुलांसाठी मोफत ऑनलाइन व ऑफलाइन सातत्याने देत असतात.शाडू मातीपासून गणपती कार्यशाळा ठाणे, मुबंईतील  विविध शाळा, वृद्धाश्रम,  घरामध्ये  बच्चेमंडळींसह  जेष्ठापर्यंत ते  परदेशी जपानी विद्यार्थ्यांन पर्यंत  त्यांनी कार्यशाळा घेतल्या असून त्यातून आता पर्यंत  दोन हजार पेक्षाही अधिक जणांना शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे  प्रशिक्षण दिले आहे. प्रदूषण विरहित व घरगुती  नैसर्गिक विसर्जनाची सुरवात व्हावी यासाठी मूर्तिकार ,चित्रकार आरती शर्मा  स्वतःच्या हातांनी बाप्पाची इकोफ्रेंडली मूर्ती साकारण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र कार्यशाळेत शिकवतात . या पर्यावरण क्षेत्रात वर्ल्ड रेकॉर्ड करून  आपल्या भूमीचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून पर्यावरण संदेश द्यायचा आहे. असे आरती शर्मा यांनी पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading