कळव्यात पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

कळवा येथे दत्तवाडी बस स्टॉप जवळ पाईपलाईन फुटली होती. हजारो लिटर पाणी वाया गेले. आज मध्यरात्रीच्या सुमारास पाईपलाईन फुटल्याची तक्रार आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली. सध्या ठाण्यात पाईपलाईन फुटण्याचे प्रकार वारंवार घडत असून यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाईपलाईन फुटल्याचं कळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे काही वेळ पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading