कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून सामुहिक रजेवर

कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील निवासी डॉक्टर आपल्या मागण्यांसाठी उद्यापासून सामुहिक रजेवर जाणार आहेत. कळवा रूग्णालयातील ज्येष्ठ आणि कनिष्ठ असे दोन्ही डॉक्टर्स मानधनातील वाढ आणि इतर मागण्यांसाठी सामुहिक रजेवर जाणार आहेत. जोपर्यंत या मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे सामुहिक रजा आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा या निवासी डॉक्टरांनी दिला आहे. मात्र हे सामुहिक रजा आंदोलन करताना हे डॉक्टर अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवणार असल्याचं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading