कळवा, विटावा, खारेगाव विकासाची पंचसूत्री

कळवा, विटावा, खारेगाव या विभागाच्या विकासासाठी आणि येथील समस्या तातडीने मात्र कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी उपायोजना राबविण्याबाबत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी या तिन्ही विभागातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी अहवाल, आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी अधिकचे आपला दवाखाना, पाणी पुरवठा, महानगरच्या माध्यमातून घरगुती गॅस पुरवठा, तसेच शौचालयांची दुरुस्ती आणि नव्याने उभारणी या महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यासर्व विषयांचे सविस्तर अहवाल येत्या एक महिन्याच्या कालावधीत सादर करण्याचे आदेशही यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले. शिवसेना शाखा संपर्क अभियानांतर्गत खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच कळवा शहरातील विभागांना भेटी दिल्या होत्या. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न आणि समस्या उपस्थित केल्या होत्या. या सर्व समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत खासदार डॉ. शिंदे यांनी कळवा, विटावा, खारेगाव विभागांच्या शाश्वत विकासाची पंचसूत्री मांडली. यामध्ये शिक्षण, स्वच्छ्ता, आरोग्य, घरगुती गॅस जोडणी, मुबलक पाणी पुरवठा यांसारख्या महत्वाच्या विषयांवर काम करण्याच्या सूचना यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिल्या. याअंतर्गत कळवा, विटावा आणि खारेगाव या विभागांमधील शिक्षणाचा आणि महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी एक प्राथमिक अहवाल तयार करण्यात यावा, यामध्ये विद्यार्थी पटसंख्या, शाळेच्या इमारतीची सद्यस्थितीची पाहणी करणे, शाळा अद्ययावत करण्यासाठी उपाययोजना राबविणे, या अहवालाच्या पूर्ततेसाठी ठाणे तसेच आसपासच्या खासगी शाळा संचालकांसह तसेच शिक्षणतज्ञांचा समावेश करत एक समिती स्थापन करण्यात यावी, त्यांच्याद्वारे महापालिकेच्या शाळांची स्थिती कशी बदलता येईल याबाबत अहवाल तयार करण्यात यावा, अशा सूचना यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयुक्तांना दिल्या.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading