कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज कळवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले. ही कारवाई महापालिका आयुक्तांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. या कारवाईतंर्गत कळवा प्रभाग समिती येथील शंकर मंदिर शेजारी, कळवा येथे ७ कॉलम तोडण्यात आले. कळवा नाका, जुम्मा मस्जिद येथे ६ कॉलम तोडण्याची कारवाई करण्यात आली. सुदाम सोसायटीच्या बाजूला, कावेरी सेतू येथील बांधकामाचे स्लॅब आणि कॉलम कट करण्यात आले. कळवा मच्छी मार्केट जवळ, बांधकामाचे स्लॅब तोडण्यात आले. मयूर हॉटेल मागे, खारीगाव येथील बांधकामाचे स्लॅब आणि कॉलम तोडण्यात आले तसेच रवींद्र हॉटेल मागे, खारीगाव येथील बांधकामाचे स्लॅब आणि कॉलम निष्कासित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading