कळवा खाडीमध्ये तोल जाऊन पडलेल्या सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह अखेर ६ दिवसांनी मिळाला

कळवा खाडीमध्ये तोल जाऊन पडलेल्या सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह अखेर आज संध्याकाळी मिळाला आहे. नागसेन नगर येथील रिशी उस्वा हा ७ वर्षाचा मुलगा कळवा खाडीशेजारी सायकल चालवत असताना १३ जुलै रोजी तोल जाऊन खाडीमध्ये पडला होता.
त्यानंतर गेल्या ६ दिवसांपासून घटनास्थळी स्थानिक मच्छीमार खारकर यांच्या टीमसोबत ठाणे नगर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे अग्निशमन दलाचे अधिकारी-जवान ३ बोटींच्या मदतीने शोधकार्य करत होते. आज अखेर पावणे सहाच्या सुमारास विटावा ते ऐरोली खाडीच्या दरम्यान या मुलाचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील कार्यवाही नेण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading