कल्याण येथील वडवली गावात एका घरात ब्लॅक क्रोबा शिरल्याने गावकऱ्यांची धांदल

कल्याण येथील वडवली गावात एका घरात ब्लॅक क्रोबा शिरल्याने गावकऱ्यांची धांदल उडाली होती. वडवली गाव परिसरात राहणार्‍या दुर्गेश झा ह्यांच्या घरात भला मोठा नाग  शिरल्याने घरातील लोकांची भितीने धादंल उडाली. स्थानिक नागरिकांनी सर्पमित्रांना संपर्क साधून माहिती दिली. त्यावेळी सर्पमित्र रोमेश यादव  आणि प्रतीक पाटील ह्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत घरात शिरलेल्या ब्लॅक क्रोबा प्रजातीच्या मोठ्या नागास पकडून जीवदान दिले. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. ब्लॅक कोब्रा प्रजातीचे नाग साधारणपणे मध्य प्रदेश, राजस्थान ह्या भागात जास्त प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे कल्याणमध्ये ब्लॅक कोब्रा आढळल्याने प्राणी मित्रांनी आश्चर्य व्यक्त केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading