कल्याण डोंबिवली कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण डोंबिवली कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रूग्णालये आणि मेडिकल दुकाने वगळता इतर दुकानांना बंदी घातली आहे. होम डिलिव्हरी करणा-या दुकानदारांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणा-यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून वाहनेही जप्त केली जाणार आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांनीही पालिका क्षेत्रातील रुग्णालये आणि मेडिकल दुकाने वगळता किरणामाल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सकाळी पाच ते दुपारी दोन पर्यंत होम डिलिव्हरी करतील अशी दुकाने सुरू ठेवण्याचेही आदेश देण्यात आले असून, या आदेशाचे उल्लंघन करणा-या दुकानदारांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसेच भाजीपाला, फळ विक्रेत्यांनी एका जागेवर बसून विक्री न करता हातगाडीवर फिरून विक्री करावी, त्याचबरोबर पालिका क्षेत्रात दुचाकी अत्यावश्यक सेवा वगळता इतर चारचाकी वाहनबंदी करण्यात आली असून जी वाहने आढळतील त्यांच्या कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे .

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading