कल्याण-डोंबिवलीकरांसाठी उद्यापासून १५ डब्याच्या उपनगरीय गाड्यांच्या फे-या

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी १५ डब्याच्या उपनगरीय गाड्यांच्या फे-या उद्यापासून सुरू होणार आहेत. ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्यामुळं रेल्वे सेवेवरील ताण सुसह्य करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे करत असलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून उद्यापासून डोंबिवलीकरांसाठी १५ डब्यांची गाडी उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावरील १२ डब्यांच्या ४ फे-यांचं परिवर्तनही १५ डब्यांच्या फे-यात करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेनं ७ वर्षापूर्वी १५ डब्यांची एक लोकल सुरू केली पण त्यात वाढ केली नव्हती. अति गर्दीमुळं लोकल मधून पडून प्रवासी जखमी अथवा मृत्यू होण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळं आता उद्यापासून सुरू होणा-या १५ डब्यांच्या उपनगरीय गाडीमुळं प्रवाशांचा प्रवास काहीसा सुसह्य होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading