कल्याणमध्ये माजी कुलगुरूंना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक

कल्याणमध्ये माजी कुलगुरूंना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीअसून तिघांचा शोध सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेतील कर्णिक रोड परिसरात नाशिक यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे माजी कुलगुरू व छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक प्रधान यांच्या राहत्या घरी पाच आरोपीं शिरूर त्यांना बेदम मारहाण करत त्यांच्या वस्तू चोरून 20 लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा कल्याण महात्मा फुले पोलिसांकडे दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत पाच आरोपींरोधात गुन्हा दाखल करत, या गुन्ह्यात फरार असलेल्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. संजय भागवंत जाधव, संदेश जाधव असे या दोन्ही आरोपींची नाव असून यात संजय जाधव हा शिक्षक असून 2017 ला त्याला शिक्षक पदावरून कारवाई करत निलंबित करण्यात आले होते. पण निलंबनानंतर त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून वेळेवर हप्ते भरले नाही, म्हणून त्याचं घरी जप्तीला निघाल्याने त्याने आपल्या मित्रासह माजी कुलगुरूंच्या घरी जाऊन मला पुन्हा कामावर घ्या, अन्यथा हप्ते भरण्यासाठी वीस लाख रुपये द्या, असे सांगत त्यांना घरात कोंडून मारहाण करत त्यांच्या वस्तू घेऊन फरार झाला होता. मात्र, गुन्हा दाखल होताच कल्याण महात्मा फुले पोलिसांनी तात्काळ या शिक्षकांचा शोध घेत त्याला व त्याच्या एका सहकार्याला अटक केली असून त्याच्या सोबत असलेल्या अन्य तीन जणांचा शोध सुरू आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading