कल्याणमध्ये टोईंग व्हॅनचं नियंत्रण सुटल्यानं झालेल्या अपघातात अनेक गाड्यांचं नुकसान

वाहतूक शाखेच्या टोईंग व्हॅन या नेहमी वादग्रस्त ठरल्या आहेत. या ना त्या कारणानं कोणता ना कोणता वाद या टोईंग व्हॅनबाबत निर्माण होत असतो. आज कल्याणमध्ये एका टोईंग व्हॅनचं नियंत्रण सुटल्यानं झालेल्या अपघातात अनेक गाड्यांचं नुकसान झालं. कल्याण स्टेशन रोडवर टोईंग व्हॅनचं नियंत्रण सुटल्यानं या टोईंग व्हॅननं ९ दुचाकी आणि एका कारला धडक दिली आणि ती सोन्या चांदीच्या दुकानात घुसली. या धडकेमुळं कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी गाड्यांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading