कल्याणच्या त्रिशा सोनवणेची ट्रेनिंग सुपरस्टार स्पर्धेसाठी निवड

कल्याण, येथील त्रिशा सोनवणे हिची मायबोली मराठी वाहिनीच्या “ट्रेनिंग सुपरस्टार” ( नृत्य आणि सौंदर्य स्पर्धा) या स्पर्धेसाठी निवड झाली. होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल मध्ये त्रिशा सीनियर केजी मध्ये शिकत आहे . अंतिम फेरीत आपल्या सौंदर्याने स्पर्धेमध्ये प्रदर्शन करून तिने सर्वांनाच मागे टाकले ,त्रिशाने पहिला क्रमांक पटकाविला. त्रिशा ही अवघ्या पाच वर्षाची असून तिने ‘इंडिया बिगेस्ट मॉडेल ‘ ही पदवी मिळवली असून “इंडिया सुपर मॉडेल 2023” म्हणून तिने एक सुवर्ण असा “क्राऊन ” मिळवला, त्यामध्ये तिचे आई-वडिलांचा तसेच राहुल रेड्डी सर यांचा मोलाचा वाटा आहे. तिच्या समाजातील लोकांनी तिला मंगळागौर या कार्यक्रमात बोलवून तिचे सत्कार केला. तिच्या या यशाबद्दल कल्याण शहर तसेच ठाणे शहरांमधील पुंडलिक मोरे यांनी अभिनंदन केले, तसेच तिच्या शाळेतील शिक्षकांनी देखील तिचे अभिनंदन केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading