कर्नाटक काँग्रेस चे कार्याध्यक्ष जारकिवली यांनी केलेल्या देशद्रोही विधानाबाबत ठाणे भाजपा तर्फे निषेध आंदोलन

आमदार संजय केळकर आणि भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक काँग्रेस चे कार्याध्यक्ष जारकिवली यांनी केलेल्या देशद्रोही विधानाबाबत ठाणे भाजपा तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. हिंदूंचा अपमान करण्यात कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकिवली यांनी हिंदू हा पर्शियन शब्द असून,त्याचा अर्थ अत्यंत घाण आहे. हिंदू हा शब्द आमच्यावर का थोपवला जातोय.असे हिंदू विरोधी वक्तव्य केले आहे,यातच भर घालत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या धर्मवीर उपाधीचा आणि मराठ्यांचा अपमान करत धर्मवीर उपाधींसाठी मराठी लायक नाहीत.असेही अत्यंत घृणास्पद वक्तव्य केले आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिमांच्या मदतीने मोगलांविरुद्ध लढा देत मस्जिद उभारली होती अशी मुक्ताफळे उधळली आहेत त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading