कर्तव्य बजावत असतानाही एका पोलीसानं दाखवलेल्या भूतदयेबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक

कर्तव्य बजावत असतानाही एका पोलीसानं दाखवलेल्या भूतदयेबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. ठाणे ग्रामीण महामार्ग वाहतूक विभागात काम करणारे पोलीस कर्मचारी संजय घुडे माळशेज घाट येथे अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. तर कल्याणच्या खडकपाडा परिसरात ते कुटूंबासह राहत असून रोजच्या प्रमाणे कल्याण ते माळशेज घाट येथे कामाच्या ठिकाणी हजर होतात. भर रणरणत्या उन्हात अलिकडेच दुपारच्या सुमाराला माळशेज घाट मार्गातील आंबेच्या वळण या ठिकाणी एक माकड पाण्याच्या शोधात जगंलातून घाट मार्गावर फिरत होते. त्याचवेळी पोलीस कर्मचारी घुडे यांच्या पाण्याची बाटली पाहून ते माकड व्याकुळ होऊन त्याच्याकडे पाहत होते. घुडे यांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी माकडाला रस्त्यावरच पाण्याने भरलेली बाटली आपल्या हाताने त्याच्या तोंडाला लावून त्याची तहान भागवली. घुडे यांनी दाखवलेल्या या भूतदयेबद्दल त्यांचं कौतुक होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading