करोना विषाणू आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणती काळजी घेण्यात यावी याविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन

करोना विषाणू तसंच हवेमधून पसरणा-या अन्य जंतूसंसर्ग आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणती काळजी घेण्यात यावी याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं पालिकेतील सर्व अधिकारी-कर्मचा-यांसाठी एक दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. करोना आजाराबाबत सध्या सर्वत्र गैरसमज पसरत आहेत. चीनमधील करोना विषाणू बाधित क्षेत्रामधील येणा-या प्रवाशांमध्ये अथवा करोना विषाणू रूग्णांच्या संपर्कात आल्यास या आजाराची शक्यता उद्भवू शकते. करोना विषाणूजन्य आजार भारतात पसरू नये यादृष्टीनं चीनमधून भारतात येत असलेल्या सर्व प्रवाशांचे विमानतळावर स्कीनिंग करण्यात येते. करोना हा विषाणून हवेमार्फत पसरतो. ठाणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांना करोना विषाणू संक्रमणापासून बचाव करण्यासाठी उपाययोजनांची माहिती मिळावी यासाठी आरोग्य विभागाच्या वतीनं या मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाचे सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद उबळे आणि लोकमान्य टिळक महापालिका रूग्णालयाच्या अधिव्याख्यात्या डॉ. डेस्मा यांनी मार्गदर्शन केलं. क्षयरोगासारखे हवेद्वारे पसरणा-या जंतूसंसर्ग आजारांपासून बचावाकरता हवाजनित संसर्ग नियंत्रण उपाययोजनांची गरज आहे. याकरिता महापालिकेचे अधिकारी-कर्मचा-यांना वैयक्तीक आणि कामाच्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना कराव्या याबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading