कंपनीची रोकड बँकेत भरण्यासाठी जाणा-या व्यक्तीला लुटणा-यास कल्याण गुन्हे शाखेनं केली अटक

कंपनीची रोकड बँकेत भरण्यासाठी जाणा-या व्यक्तीला लुटणा-यास कल्याण गुन्हे शाखेनं अटक केली आहे. शशिकांत चव्हाण हे क्रांती मर्कन्टाईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करतात. ते कंपनीची १६ लाख १३ हजाराची रोकड घेऊन आपल्या दुचाकीवर बसून कल्याण जनता सहकारी बँकेत भरण्यासाठी जात असताना त्यांना दोन अनोळखी व्यक्तींनी अडवलं. अंबरनाथ जत्रे में तू मेरे बहेन को छेडा था असं बोलून या दोघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तुला पोलीस ठाण्यात घेऊन जातो असं सांगून त्यांना दुचाकीवर मध्यभागी बसवून आंबिवली स्टेशनच्या रोडवर नेले आणि त्यांना दुचाकीवरून उतरवून त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग, मोबाईल हिसकावून घेऊन ये सब नाना को दिखाना है सांगून भर वेगात निघून गेले. याप्रकरणी पोलीसांकडे तक्रार केल्यानंतर कल्याण गुन्हे शाखेनं कौशल्यानं तपास करून लखन रोकडे, प्रतिक अहिरे, योगेश राजवळ अशा तिघांना अटक केली आणि या जबरी चोरीतील १४ लाख ८० हजारांची रोकड या तिघांकडून हस्तगत केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading