औरंगाबाद येथे झालेल्या बेंचप्रेस स्पर्धेत विटावाच्या सुश्मिता देशमुखला सुवर्ण पदक

औरंगाबाद येथे झालेल्या बेंचप्रेस स्पर्धेत ठाण्यातील विटावा येथे राहणारी खेळाडू सुश्मिता सुनील देशमुख हिने सुवर्ण पदक मिळवले. सुश्मिता ही कल्याण च्या कारभारी जिमनॅशियम मध्ये प्राशिक श्रवनायक जयराम कारभारी यांच्या मार्गदशनाखाली सराव करते. तसेच डिसेंबर महिन्यात गोवा येथे होणार्‍या राष्ट्रीय स्तरीय बेंचप्रेससाठी निवड झाली आहे.
सुश्मिता ही आशियाई स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती खेळाडू आहे. महाराष्ट्र राज्य पॉवेलिफ्टिंग असोसिएशन मुंबई आणि औरंगाबाद पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या विद्यामाने औरंगाबाद येथे ज्युनिअर, ज्युनिअर, सिनिअर, आणि मास्टर (पुरुष /महिला) गटाच्या बेंच प्रेस स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेसाठी 15 जिल्ह्यांनी भाग घेऊन 450 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्याच्या खेळाडूंनी घव घवीत यश संपादन करून जिल्ह्याला सिनिअर गट (पूरुष) 59 किलो वजनी गटामध्ये अक्षय राठोड याने स्ट्राँग मान हा ’किताब मिळविला. आणि इतर स्पर्धेकांनी सुवर्ण, रौप्य पदके, ब्रँझ पदकांची लय लूट केली. त्यामुळे जिल्ह्याला 1 सांघिक विजेते पद, आणि 3 उप विजेतापदे मिळाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading