ऑटोरिक्षा – टॅक्सीचे नवीन दर 1 ऑक्टोबर पासून लागू होणार

मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणामार्फत प्रवाशी वाहतुकीच्या ऑटोरिक्षा ,काळी पिवळी टॅक्सी आणि कुल कॅब यांचे नवीन दर निश्चित केले असून १ ऑक्टोबरपासून हे दर लागू राहणार असल्याची माहिती ठाण्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक खेनट यांनी दिली आहे. या पूर्वीचे दर मार्च 2021 मध्ये लागू करण्यात आले होते. परंतु गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षात सी एन जी इंधनाच्या दरात वाढ झाली असुन सीएनजी इंधनाचे दर ४९.४० रूपयांवरुन ८० रूपये झाले आहेत. खटुआ समितीच्या शिफारशीच्या आधारे सध्याचा महागाई निर्देशांक आणि वाढलेले इंधनाचे दर तसेच वाहनाची सरासरी किंमत इतर संबधित बाबी विचारत घेऊन त्याचप्रमाणे ऑटोरिक्षा, टॅक्सी चालक मालक आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हितास प्राधान्य देवून मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणाने 26 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये वाहनांच्या भाडेवाढीचा ठराव पारित केला आहे. ऑटोरिक्षा नवीन दर पहिल्या टप्प्यातील 1.5 किमीसाठी 23 रुपये तर पुढील प्रत्येक कि.मी साठी 15.33 रुपये इतके असेल.काळी पिवळी टॅक्सी नवीन दर पहिल्या टप्प्यातील 1.5 किमीसाठी 28 रुपये इतके असेल तर पुढील प्रत्येक कि.मी साठी 18.66 रुपये इतके असेल.कुल कॅब AC नवीन दर पहिल्या टप्प्यातील 1.5 किमीसाठी 40 रुपये तर पुढील प्रत्येक कि.मी साठी 26.71 रुपये इतके असेल. ऑटोरिक्षा टॅक्सी परवानाधारकांनी भाडेमीटरचे रिकॅलीब्रेशन १ ऑक्टोबर पासुन ३० नोव्हेंबरपर्यंत करुन घेणे आवश्यक आहे.भाडेमीटरचे रिकॅलीब्रेशन होईपर्यंत सुधारित अधिकृत टॅरिफकार्ड ३० नोव्हेंबर पर्यंतच अनुज्ञेय राहील.मुंबई महानगर परिवहन प्राधिकरण क्षेत्रामध्ये पेट्रोल रिक्षांना सुध्दा CNG इंधनावर चालणा-या रिक्षांचेच दर लागू राहतील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading