ए के जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील रोशनी मासिकाचं २५ व्या वर्षात पदार्पण

विद्या प्रसारक मंडळाच्या आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील रोशनी हे मासिक यंदा २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या शाळेचे अधिक्षक रोशन जाल पटेल यांच्या स्मरणार्थ हे मासिक सुरू करण्यात आलं होतं. सध्या शाळेच्या अधिष्ठात्री कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मासिक समिती शाळेमधील विद्यार्थ्यांमधील लेखनकला, कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी सजग असते. हे मासिक अल्पावधीत विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले आहे. पहिल्या भागामध्ये सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिशुवर्ग, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आपल्या विभागांच्या वर्षभरातील घडामोडींचा आढावा सादर करतात. त्यानंतरच्या विभागात इंग्रजी, हिंदी, मराठी, संस्कृत, गणित, शास्त्र, खेळ, चित्रकला, संगीत अशा विविध विषयांवरचे लेख विद्यार्थ्यांकडून लिहून घेतले जातात. अनेक प्रकारचे लेख, कविता, छोट्या गोष्टी, विनोदी किस्से विद्यार्थी स्वत: लिहितात. संपादकीय लिहिण्यात शिक्षकांचा वाटा असतो. शाळेचे माजी विद्यार्थी आपल्या शालेय जीवनातील आठवणी लिहितात. जाहिरत नसणे हे या मासिकाचे वैशिष्ट्य आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या दैदिप्यमान यशांचे फोटोही या मासिकामध्ये पहायला मिळतात. या मासिकाच्या मलपृष्ठावर प्रत्येक वर्षी झालेल्या शैक्षणिक उपक्रमांची छायाचित्रं छापली जातात. असं हे रोशनी मासिक सध्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading