एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता महाव्यवस्थापकांचा चालक-वाहकांशी संवाद

एसटीची ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात यावर एसटीच्या महाव्यवस्थपकांनी काल चालक-वाहकांशी संवाद साधला.
एसटी ची ढासळलेली अर्थव्यवस्था कशी सुधारायला पाहीजे,त्यासाठी काय काय उपाययोजना करायला हव्यात , हे चालक-वाहका इतकं कोणीही अधिक चांगल्या पद्धतीने सांगु शकत नाही .चालक-वाहक हे प्रत्यक्ष रस्त्यावर काम करत असतात. चालक-वाहक हाच तर एसटी महामंडळाच्या संपुर्ण आर्थिक डोला-याचा खरा कणा असल्याने महामंडळाचे नव्याने वाहतुक महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारलेल्या सुहास जाधव यांनी थेट कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. करोना महामारीचा खुप मोठा फटका एसटी च्या अर्थव्यवस्थेवर झाला असुन एसटी चा गाडा पुर्वपदावर कसा आणला पाहीजे यासाठी चालक-वाहकांच्या सुचना महाव्यवस्थापकांनी ऐकुन घेतल्या. सुहास जाधव नुकतेच वहातुक महाव्यवस्थापकपदी विराजमान झाले असले तरी त्यांची एसटी च्या नोकरीची सुरूवात अगदी सुरुवातीच्या पदांपासून झालेली असल्याने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विविध विभागात त्यांनी काम केले आहे. महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारताच जाधव यांनी चालक वाहकांशी सुसंवाद सुरु केला आहे. एसटी च्या उत्पन्न वाढीसाठी काय करायला हवे याबाबत चालक वाहकांच्यायेणाऱ्या विविध सुचनांचा अभ्यास करुन त्या सुचनांची अमलबजावणी करण्यासाठी तात्काळ पावलं उचलली जातील.असेही जाधव यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading