एन.टी.केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

ठाण्याचा, महाराष्ट्राचा आणि देशाचा क्रिकेट पुढे जायचा असेल तर नवनवीन खेळाडू घडविण्यासाठी सराव आणि स्पर्धा पाहिजेत आणि खेळाडूंना ती संधी मिळवून देण्याचे काम गेली ४७वर्षे स्टार्स स्पोर्टसच्या माध्यमातून मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न एन.टी.केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट अविरतपणे करीत आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने ३७वर्ष दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलाच्या खेळपट्टीवर आणि अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी जिल्ह्यातील खेळाडूंना मिळणे हे त्यांच्यासाठी भाग्य असल्याचे आमदार संजय केळकर म्हणाले. एन.टी.केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सदानंद केळकर, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते आज दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल येथे करण्यात आले. जवळपास २५ते ३० संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत .आजचा पहिला सामना सिंघानिया स्कूल विरूद्ध सरस्वती शाळा असा रंगणार असून टॉस जिंकण्याचा पहिला मान सरस्वती शाळा या क्रिकेट संघास मिळाला. साधारणपणे महिनाभर चालणाऱ्या या टुर्नामेंटच्या बक्षीस वितरण समारंभाच्या दिवशी मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष काळे उपस्थित राहणार असून या माध्यमातून अंजिक्य रहाणे सारखे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जाचे खेळाडू तयार झाले आहेत. आतापर्यंत ७५० खेळाडू या स्पर्धेतून तयार झाले असल्याचे आमदार केळकर म्हणाले. तर मध्यंतरी अंजिक्य रहाणे याने आपले क्रिकेट विश्वातील भविष्य घडविण्यात या एन.टी.केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट टुर्नामेंटचे मोठे योगदान असल्याचे बोलून दाखवले असेही केळकर म्हणाले.या प्रसंगी त्यांनी सदानंद केळकर यांनी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची रूईयात असताना गोल्डन विकेट कशी काढली होती याची आठवण करून देणारा प्रसंग उपस्थित खेळाडूंना सांगितला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading