एकाच वेळी ऑनलाईन विमान शास्त्र शिकण्यासाठी 3091 सहभागी सहभागी व्यक्तींनी रचला नवा गिनिज विश्वविक्रम..


भारत देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून शतकीय महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. नुकताच चांद्रयान-3 च्या यशस्वी उड्डाणानंतर देशात आनंदाचे वातावरण आहे. याच आनंदी वातावरणात विज्ञानविषयक विचारधारेला प्रोत्साहन देण्यासाठी टिंकर टाईम संस्था व व्यास क्रिएशन्स् यांच्या संयुक्त विद्यमाने पहली उडान हा ऑनलाईन विमानशास्त्र शैक्षणिक उपक्रम आयोजित केला होता.
विमानशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांसह सर्वांनाच सोप्या भाषेत समजण्यासाठी व त्याविषयी जनजागृती करण्यासाठी या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. या शैक्षणिक उपक्रमास, भारतातील अनेक राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक पालक आणि शाळा महाविद्यालयांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला . प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष शाळा – महाविद्यालय यांच्या माध्यमातून अंदाजे 3 करोड 60 लाख लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचला हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे . या पूर्वी ऑनलाईन विमानशास्त्र शिकण्याचा 1500 सहभागी व्यक्तींचा विश्वविक्रम होता.
Tinkar Time, व्यास क्रिएशन्स आणि सहयोगी संस्थांच्या वतीने एकाच वेळी ऑनलाईन विमानशास्त्र शिकण्यासाठी 3091 विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 ते 10.30 या वेळेत ऑन लाईन you tube वर उपस्थिती दर्शवून नवीन विश्वविक्रम नोंदवला. रजिस्ट्रेशन केलेल्या हजारो जणांपैकी अनेकांनी फोन करून अथवा मेसेज करून या उपक्रमाचे कौतुक केले.
या गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचा कार्यक्रम रविवार, दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 या वेळेत फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ इंडिया-टीएमए हॉल, फेडरेशन हाऊस, एस.जी. बर्वे मार्ग, वागळे इस्टेट (पश्चिम)-400 604 येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला लंडन स्थित गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चे चीफ ॲडज्युडीकेटर ऋषी नाथ, फॅसिलेटेटर मिलिंद वेर्लेकर सर उपस्थित होते. ऋषी नाथ ह्यांच्या हस्ते टींकर टाईम चे संस्थापक श्री पुरुषोत्तम पाचपांडे यांना टाळ्यांचा गजरात गिनीज वर्ल्ड रेकॉडचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. उपस्थित सर्वांनी टींकर टाईम संस्था आणि व्यास क्रिएशन्स संस्थेचे अभिनंदन केले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब 3142, राज्ञी वूमन वेलफेअर असोसिएशन, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्था ठाणे या सहयोगी संस्था आणि कप्तान निशांत पाटील,कॅप्टन शर्विन जोशी,कॅप्टन ऋषीकेश नवले, कॅप्टन अग्नेल,माधव खरे, प्रशांत नानिवडेकर, सुशांत गायकवाड, मंदार कुलकर्णी आदी व्यक्तींचे आणि व्यास क्रिएशन्स टीमचे सहकार्य लाभले त्यांचे कौतुक आणि आभार व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांनी मानले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading