एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मानपाडा येथील महिला भवनचे लोकार्पण

महिलांना हक्काचे ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे महिला भवनचा लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते झाला. माजी महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या महिला भवनची उभारणी करण्यात आली. चितळसर मानपाडा परिसरात ग्रामपंचायत काळापासूनच शिवसेनेची सत्ता आहे, या परिसरावर आनंद दिघे साहेबांचे विशेष प्रेम होते, त्यामुळे आज त्यांच्या नावाने या परिसरात भव्य दिव्य अशी वास्तू उभारण्यास पालिकेने पुढाकार घेतला याचा आनंद होत असल्याचे असे उद्गगार एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. या परिसरातील नागरिकांना निश्चितच छोट्या मोठया कार्यक्रमासाठी या वास्तूचा उपयोग होणार आहे. तसेच प्रभागात साथीचे आजार पसरु नयेत यासाठी माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी औषध फवारणी, धूर फवारणी मशीन घेतल्या असून त्याचाही शुभारंभ एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading