उल्हासनगरच्या प्रांजल पाटील ठरल्या देशातील पहिल्या दृष्टीहीन भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी – स्वीकारला तिरूवनंतपुरममध्ये सब कलेक्टर म्हणून पदभार

देशातील पहिल्या दृष्टीहीन भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून प्रांजल पाटील यांनी तिरूवनंतपुरमच्या सहजिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. प्रांजल पाटील या मूळच्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या रहिवासी आहेत. त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतून इंटर्नल रिलेशन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यांनी प्रथम २०१६ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यावेळी त्यांना ७७३ वा क्रमांक मिळाला होता. त्यामुळं त्या भारतीय महसुल सेवेसाठी पात्र ठरल्या होत्या. पण दृष्टीहीन असल्यामुळं त्यांना नियुक्ती मिळाली नव्हती. त्यामुळं त्यांनी पुन्हा २०१७ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि १२४ वा क्रमांक मिळवला. त्यामुळं त्या भारतीय प्रशासकीय सेवेत पात्र ठरल्या. त्यांची केरळ राज्यामध्ये निवड झाली आहे. त्यांनी अलिकडेच तिरूवनंतपुरम् च्या सहजिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यावेळी जिल्हाधिकारी के. गोपालकृष्णन् यांनी त्यांचं स्वागत केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading