उद्या सूर्यास्तानंतर होलिका प्रदीपन करण्याचं दा. कृ. सोमणांचं आवाहन

प्रदोषकाळी फाल्गुन पौर्णिमा ज्या दिवशी असते तो दिवस होळी पौर्णिमेचा समजला जातो. उद्या म्हणजे २० मार्च रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होत असून गुरूवारी सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी पूर्ण होत आहे. म्हणून बुधवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर होलिका प्रदीपन करून हुताशनी पौर्णिमा साजरी करायची आहे अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. ही एकप्रकारची अग्निपूजाच असून होळीला नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरण पूरक होळी पौर्णिमा साजरी करण्याचं आवाहन दा. कृ. सोमण यांनी केलं आहे. होळी पौर्णिमेसंदर्भात पुराणात वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत. परंतु वैज्ञानिक दृष्टीकोनातून सांगायचे म्हणजे वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा सण आहे. शिशीर ऋतूमध्ये ब-याच वृक्षांची पानगळ होते. तो पालापाचोळा जाळून परिसर स्वच्छ केला जातो. वसंत ऋतूचे स्वागत करताना त्वचेला आणि डोळ्यांना हानीकारक असे रासायनिक रंग न वापरता होळी साजरी करावी असं सांगून हा सण उत्तरभारतात दोलायात्रा म्हणून तर दक्षिण भारतात कामदहन म्हणून ओळखला जातो अशी माहितीही दा. कृ. सोमण यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading