उथळसर पेटीवरील 70 सफाई कर्मचा-यांचा कोविड योध्दा पुरस्काराने गौरव

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उथळसर पेटीवरील 70 सफाई कर्मचा-यांचा कोविड योध्दा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘8 दशके कृतज्ञनतेची’ हा उपक्रम राबविण्यात येत असून कोरोनाच्या काळात ठाणे स्वच्छ ठेवणार्‍या सफाई कामगारांचा ‘कोविड योद्धा’ पुरस्काराने गौरव करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून उथळसर येथील सुमारे 70 सफाई कामगारांना ‘कोविड योद्धा’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. ठाणे शहरात कोरोनावर अटकाव घालण्यात सफाई कामगारांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, तळागाळातील या वर्गाचा सन्मान कोणीही केला नसल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका सेवेतील सफाई कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. 12 डिसेंबर रोजी मुख्य सोहळ्यामध्ये 5 सफाई कामगारांचा गौरव करण्यात आला तर उर्वरित सफाई कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन गौरविण्यात येत आहे. आज उथळसर येथील पेटीवर जाऊन 70 सफाई कामगारांचा प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading