उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेची दिव्यात धडक कारवाई

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ता रुंदीकरणात बाधीत होत असलेल्या दिवा स्टेशन ते दिवा सर्कल परिसरातील अनधिकृत बांधकामावर आज ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समितीमधील 6 इमारतीमधील 123 सदनिका आणि 43 गाळे निष्कसित करण्यात आले असून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर पडले गांव, येथे करण्यात आले आहे. रस्तारुंदीकरणात बाधीत होत असलेल्या दिव्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश उच्चन्यायालयाने ठाणे महापालिकेस दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading