आत्तापर्यंत ५९७ पोलीसांची कोरोनावर मात

ठाणे पोलीस आयुक्तालयातील आत्तापर्यंत ७५६ पोलीस कोरोना संक्रमित झाले असून ५९७ पोलीसांनी कोरोनावर मातही केली आहे. कोरोनाशी मुकाबला करताना पोलीसांची कामगिरी महत्वपूर्ण आहे. जीवाची पर्वा न करता गेले तीन ते चार महिने पोलीस कोरोनाशी अहोरात्र लढा देत आहेत. सद्यस्थितीत पोलीस आयुक्तालयातील १५४ पोलीस उपचार घेत असून दुर्दैवानं आत्तापर्यंत ५ पोलीसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तरीसुध्दा हे कोविड योध्दे मोठ्या जिद्दीने कोरोनाचा मुकाबला करत आहेत. यामध्ये त्यांच्या कुटुंबाचाही वाटा मोलाचा असून त्यामुळेच हे योध्दे दिवसरात्र झटत असल्याचं दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading