आता लढाई सुरु झाली आहे, तेव्हा २०२४ ची ट्रेन सुटली तर पुन्हा संधी नाही – उद्धव ठाकरे

विकास करीत आहात म्हणुन तुमची गुलामी सहन करणार नाही. असे भाष्य करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे मोदी सरकार विकास करीत असल्याची कबुली दिली. खासदार राजन विचारे यांनी हिंदी भाषिक कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन शनिवारी गडकरी रंगायतन येथे केले होते. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हे भाष्य केले. याप्रसंगी,खासदार संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी जिल्हाप्रमुख केदार दिघे, हिंदी भाषीक विभाग समन्वयक प्रभाकर सिंह (पप्पु) आदी उपस्थित होते.शिवसेनेच्या फूटीनंतर मोठ्या प्रमाणात नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर प्रथमच हिंदी भाषिकांची गर्दी जमवुन ठाकरे गटाने शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मराठी आणि मोडक्या तोडक्या हिंदी भाषेत संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे खोके… ओके बोलले. पुढे बोलताना माझे कुटुंब माझी जबाबदारी … अशी खिल्ली काहीजण उडवतात. पण माझ्या परिवाराची जबाबदारी मी घेतो, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेतो. असा सवाल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे,झुकेन पण हिंदुंच्या समोर,आव्हानाला मी संधी मानतो.घंटा बडवणारे हिंदुत्व नको, असे देखील ठाकरे म्हणाले. विकास इंग्रजांनी सुद्धा केला म्हणुन त्यांची गुलामी सहन केली नाही. तसेच तुम्ही विकास केला असेल तरी तुमचीही गुलामी करणार नाही. असे भाष्य करून एकप्रकारे मोदी सरकार विकास करीत असल्याची जाहिर कबुली दिली. आता लढाई सुरु झाली आहे, तेव्हा, २०२४ ची ट्रेन सुटली तर पुन्हा संधी नाही, अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना आव्हानच दिले आहे.ठाकरे गटाच्या या मेळाव्यात उपस्थित हिंदी भाषिकांनी सभागृहात शिवसेनेच्या ‘जय महाराष्ट्र ‘ ऐेवजी चक्क ‘जय श्रीराम’ व ‘भारतमाता की जय’ च्या घोषणा देत उद्धव ठाकरे यांचे स्वागत केल्याने आच्छर्य व्यक्त केले गेले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading