अवैध वाळू उपसा करणाऱ्या ३ कोटीच्या बोटी नष्ट- ठाणे महसूल विभागाची मोठी कारवाई

पुनश्च दिनेश पैठणकर नायब तहसीलदार ठाणे यांनी तहसीलदार ठाणे यांच्या हद्दीमधील कळवा खाडी मुंब्रा खाडी या परिसरात मोठी कारवाई केली आहे,सतत या भागांमध्ये वाळू माफियांचा त्रास आहे आणि त्या वाळू माफियांचा वाळू माफियांकडून सतत पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि अनेक तक्रारीकडे प्राप्त झालेले आहेत रेल्वेला देखील धोका प्राप्त झालेल्या अशा अनेक तक्रारी इकडे प्राप्त झालेली असल्याने गेल्या सतत सात दिवसापासून तहसीलदार ठाणे युवराज बांगर तसेच दिनेश पैठणकर यांनी पुनश्च मोठी कारवाई केलेली आहे या वाळू माफ्यांवरती आता धाबे दणाणले आहेत सदरची कारवाही सकाळी सात वाजल्यापासून चालू करण्यात आलेली होती परंतु भरती ओहोटी या कारणामुळे सदरची कारवाई थोडी उशिरा झाली आणि भरती ओहोटीमुळे बोट फसलेली होती ओटी अचानक आल्यामुळे बोट बसल्यामुळे आता रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे येऊन सर्व कर्मचारी अधिकारी यांना रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे असलेल्या खाडीमध्ये येऊन कारवाई करावी लागलेली आहे आणि ती कारवाई करत असताना अंदाजे तीन करोडचा मुद्देमाल त्यांनी आता पूर्णतः डिस्ट्रॉय केलेला आहे तीन करोड मुद्देमाल हा इंजिन पूर्णतः जाळून टाकलेला असल्यामुळे आता तो नादुरुस्ती झाली असल्यामुळे आता तो कुठलाही उपयोगाचा राहणार नाही म्हणजे तो आता भंगार होईल अशा प्रकारची कारवाई ही नायब तहसीलदार ठाणे दिनेश पैठणकर यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे त्यांचे सहकारी श्रीमती चौरे श्री रोकडे श्री म्हात्रे तलाठी सोमा खाकर सतीश चौधरी जाधव खानसोळे राहुल भोईर कांबळे मनोज चौधरी राजू चौधरी असे सर्व तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्या समवेत ही कारवाई पार पाडण्यात आलेली आहे यापुढे देखील अशाच कारवाई होत राहतील आणि वाळू माफियांवरती सतत त्यांची नजर असणार आहे असे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले आहे

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading